▶ अपघातात मोटारसायकल स्वाराचा मृत्यू
सिल्लोड - भोकरदन रोडवर अपघात
सिल्लोड, (प्रतिनीधी): सिल्लोड भोकरदन रस्त्यावर सोयगावदेवी पाटीजवळ २५ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास विचित्र अपघातात झाला. समोर चालणाऱ्या १० टायर लोडिंग ट्रकच्या पाठीमागील दोन टायर अचानक निखळून पाठीमागे असलेल्या मोटारसायकल स्वाराला येऊन धडकले या अपघातात मोटारसायकल स्वार गंभीर जखमी झाला होता उपचार कामी त्यांना संभाजी नगर येथे नेत असतांना फुलंब्री जवळ त्यांचा मृत्यू झाला.
अपघातात ठार झालेल्या दुचाकी स्वाराचे नाव राजू बाबुराव दुधे (वय ४८ रा, खोडकाईवाडी सिल्लोड) असे आहे. याबाबत भोकरदन पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, २५ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास राजू दुधे हे मोटारसायकल क्रमांक एम.एच २० जीए ७०७५ वर सिल्लोड कडून भोकरदनकडे एका खाजगी कंपनीत कामासाठी जात होते. याच दरम्यान लोडिंग ट्रक क्रमांक आर.जे ०२ जीसी ६०६१ हा सुद्धा सिल्लोड कडून जालन्याकडे जात होता ट्रक पुढे व त्या मागे मोटारसायकल चालत होती अचानक चालत्या ट्रकची पाठीमागील दोन चाके टायरचे एक्सल तुटून मोटारसायकल स्वाराला येऊन धडकले अन मोटारसायकल स्वार जागीच टायरची धडक बसून मोटारसायकल वरून खाली पडून गंभीर जखमी झाला.
रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी पोलिसांना फोन करून व नंतर पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने
गंभीर जखमी झालेल्या राजू दुधे यांना भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले तेथील डॉक्टरांनी त्यांना संभाजीनगर येथील जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवले मात्र रस्त्यातच त्यांचा फुलंब्री जवळ मृत्यू झाला.
या प्रकरणी भोकरदन पोलिस ठाण्यात टुक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ट्रक जप्त केला आहे. राजू दुधे यांच्या पच्यात पत्नी, आई, दोन मुली, एक मुलगा असा परिवार असून शोकाकुल वातावरणात बुधवारी सायंकाळी ७ वाजता त्यांच्या पार्थिवावर खोडकाई वाडी येथील म्हशान भूमीत अंतिम संस्कार करण्यात आले.












